‘बुली बाई’ अॅप प्रकरणी पहिला आरोपी ताब्यात, मुंबई पोलीस सायबर सेलची कारवाई

149

मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने एका २१ वर्षीय तरूणाला बुली बाई अॅप्लिकेशन प्रकरणी बंगळुरूमधून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून या तरूणाला बंगळुरूही मुंबईला आणण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला मिळालेल्या तक्रारीनंतर सायबर सेल या प्रकरणात चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे. तर हा आरोपी मुंबईत आल्यानंतर त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. केलेल्या एफआयआर तक्रारीनुसार, हे बुली बाई असं अॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे मुस्लिम महिलांचे फोटो लाऊन ते प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर या फोटोंची बोली देखील लावली जात होती.

(हेही वाचा – श्वान पथकातील ‘लॅब्रोडोर’ ची जागा घेतली ‘या’ श्वानाने)

मिळालेल्या माहितीनुसार, या अॅप्लिकेशन विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईल पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता.

असं आहे बुली बाई अॅप्लिकेशन

  • ‘बुली बाई’ अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते.
  • अपलोड करण्यात आलेल्या या 100 फोटोंपैकी त्यात काही महिला पत्रकार देखील होत्या.
  • या अपलोड केलेल्या महिलांच्या फोटोंची बोलीही लावली जाते.

अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश

या प्रकरणात आज आरोपीला अटक होण्याची शक्यता असून तसेच त्याला कोर्टात हजर केले जाऊ शकते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरवर लिहिलं होतं. कारण ‘बुली बाई’शी संबंधित 3 ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी बुली बाय अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.