…तर मुंबईत ‘लॉकडाऊन’ अटळ, काय म्हणाले आयुक्त चहल

163

राज्यासह मुंबईतही कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग फैलताना दिसतोय. अशातच हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवसापासून कठोर निर्बंध लागू करावे, लागतील असा इशारा दिला होता. त्यानंतर आता मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे सांगितले की, महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या 20 हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाचं लागेल.

काय म्हणाले इकबाल चहल…

सोमवारी, मुंबईत 8 हजार 82 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी 622 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी महत्वाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि मुंबई परिसरातील कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढती राहिली आणि एका दिवसात 20 हजारांपेक्षा ही संख्या अधिक झाली तर लॉकडाऊन अटळ असेल असे संकेत इकबाल चहल यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा ‘समृद्धी महामार्ग’ प्रगतीसाठी ‘बुस्टर डोस’! वाचा वैशिष्ट्यं)

मुंबई महापालिका वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून आता मुंबईत ओमायक्रॉनची संख्या वाढताना दिसतेय. आता मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपापली काळजी घेण्याचे आवाहन इकबाल चहल यांनी केले आहे. यावेळी त्यांनी महापालिकेकडे 30 हजार पेक्षा जास्त खाटा उपलब्ध असून औषधे आहेत व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.