गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱे भाजप नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे नितेश राणेंची अटक तूर्तास तरी टळली आहे.
राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पुन्हा शुक्रवारी अर्थात 7 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता होणार आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूचे वकील काय युक्तिवाद करणार आणि नितेश राणेंना अटक होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारकडून देण्यात आल्याने नितेश राणे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. प्रतिज्ञापत्र सादर होत नाही तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.
(हेही वाचा – …तर मुंबईत ‘लॉकडाऊन’ अटळ, काय म्हणाले आयुक्त चहल)