सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, यामुळेच बाजारात आधुनिक वाहने येत आहेत. मारुती आणि हुंदाई नंतर, टाटा मोटर्स बाजारात सीएनजी (CNG) कार लॉंच करणार आहे. टाटा कंपनीच्या टाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टिगोर ( Tata Tigor) यांचे सीएनजी मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. टाटा कंपनी त्यांच्या या कारमध्य़े कंपनी फिटेड सीएनजीची सोय करुन देणार आहे. येत्या काही काळात या दोन्ही कार भारतात लॉंच होणार असून, कंपनीने डिलरशीपच्या आधारे या गाड्यांची बुकिंग ५ हजार ते २० हजार पर्यंतचे टोकन देत सुरू केली आहे.
( हेही वाचा : एसटीला ‘साथ’ निवृत्त कर्मचाऱ्यांची! )
२ रुपयांत १ किलोमीटर प्रवास
सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सीएनजी वाहनांच्या पर्यायाची अनेक जण निवड करत आहेत. खिशाला परवडणाऱ्या कार म्हणून सीएनजी कार बाजारात लोकप्रिय आहेत. टाटाच्या या नव्या कारमधील सुविधेनुसार चालकाला अवघ्या 2 रुपयांच्या किंमतीत एक किलोमीटरचा प्रवास करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे ग्राहक नक्कीच या कारला पसंती देतील असा विश्वासही कंपनीला आहे.
पेट्रोल वाहनांपेक्षा किंमत जास्त
इतर कारच्या तुलनेत टाटा कंपनीच्या या नव्या टाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टिगोर ( Tata Tigor) या दोन कारची किंमत तुलनेने जास्त असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पेट्रोलच्या वाहनांपेक्षा या कारची किंमत ५० हजारापेक्षा अधिक असू शकते.
Join Our WhatsApp Community