मुंबईत कोविड रुग्णांची ‘दस हजारी’ पार

122

कोविडबाधित रुग्णांची सोमवारी दिवसभरात ८ हजार ०८२ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी, १० हजार ८६० नवीन रुग्ण आढळून आहेत. या रुग्णांपैकी ८३४ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी केवळ ५२ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे.

मुंबईत सोमवारी ४९ हजार २८३ चाचण्या केल्यानंतर ८ हजार ०८२ नवीन रुग्ण आढळून आले होते, तर मंगळवारी ४९ हजार ६६१ कोविड चाचण्या केल्यानंतर १० हजार ८६० रुग्ण आढळून आले आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोन्ही रुग्ण पुरुष आहेत. दोन्ही रुग्णांचे वय हे साठीपार होते. याशिवाय दिवसभरात ६५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ४ हजार ४९१ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ४७६ एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ११० दिवस एवढा आहे.

( हेही वाचा : भाजप आणि काँग्रेसचे इथे जुळतात विचार… )

मुंबईत रविवारी कंटेन्मेंट झोनमधील झोपडपट्टयांची संख्या ०९ एवढी होती, ती संख्या सोमवारी ११ एवढी होती, तर मंगळवारी ही संख्या १६ वर पोहोचली होती, तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत ३८९ वर ही संख्या पोहोचली आहे.

दिवसभरातील रुग्ण संख्या

  • एकूण बाधित रुग्ण : १० हजार ८६०
  • बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: ९ हजार ६६५ (९० टक्के)
  • मंगळवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : ८३४
  • दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्णसंख्या : ५२

एकूण दाखल रुग्ण : ४४९१

  • एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ४७ हजार ४७६
  • एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३०,५६५
  • रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : १४.७ टक्के

बरे झालेले रुग्ण : ६५४

दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०२

दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ४९ हजार ६६१

  • कंटेन्मेंट झोपडपट्टी: १६
  • सीलबंद इमारती : ३८९
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.