आयुक्तांचे आदेश महापौरांसाठी शिरसावंद्य

115

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे गटनेत्यांच्या सभेला उपस्थित राहत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या महापौरांसह गटनेत्यांना पुन्हा आयुक्तांनी आपले दर्शन ऑनलाईनच घडवले. मात्र, गटनेत्यांच्या सभेच्या पटलावर विषय घेण्याचे अधिकार हे महापौरांना असताना आयुक्तांनी महापौरांना सूचना करून केवळ दहाच विषय पटलावर घेण्याचे कळवले. त्यानुसार महापौरांनी केवळ दहाच विषय पटलावर घेत आयुक्तांचा आदेश शिरसावंद्य मानत सत्ताधारी पक्ष आपल्या आज्ञेबाहेर नाही हे दाखवून दिले.

तब्बल २१ महिन्यांनी पहिली गटनेत्यांची सभा

कोविडच्या संसर्गानंतर मार्च २०२० पासून गटनेत्यांची सभाच होऊ शकली नव्हती. परंतु तब्बल २१ महिन्यांनी पहिली गटनेत्यांची सभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंगळवारी होणारी ही सभा प्रत्यक्षा होण्याऐवजी नगरसविकास खात्यांच्या निर्देशानुसार ऑनलाईन घेण्यात आली. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे झालेल्या सभेला महापालिका आयुक्तांनीही ऑनलाईनच हजेरी लावली आहे. आजवर आयुक्तांमुळे गटनेत्यांची सभा होऊ शकली नव्हती. परंतु मंगळवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेमध्ये आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करत महापौरांना केवळ नेमक्या दहाच विषयावर चर्चा करता येईल, असे सांगितले. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडक दहा विषयच पटलावर ठेवत त्यावर चर्चा केली. मात्र, हे महापालिकेत सत्ता शिवसेना चालवते की आयुक्त असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील सरकारचा आणि मुख्यमंत्री व कॅबिनेटचा हात डोक्यावर असल्याने महापालिकेतील नेतृत्व हे रुळपांगळे बनल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच आयुक्तांच्या विरोधात बोलण्याची ताकदच सत्ताधारी पक्षात नसून सध्या महापौरांसह नेते तोंड बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – हजारो अनाथांची हरपली ‘आई’!)

सकारात्मक निर्णय होणार…

गटनेत्यांच्या या सभेमध्ये कोविड काळामध्ये ज्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयाबाई तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कंत्राटीपध्दतीवर काम करत सेवा बजावली, त्या सर्वांना सेवेत घेण्यात यावे, अशाप्रकारचा ठराव करण्यात आला आहे. यावर महापालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत सांगितले. कोविड काळात या सर्व कंत्राटी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या बळावर या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे. सध्या रुग्णालयांमध्ये विविध संवर्गातील अनेक रिक्तपदे असून यासर्वांना सामावून घेतल्यास त्यांचा चांगल्याप्रकारे उपयोग रुग्णालयीन कामकाजात व उपचार यंत्रणा राबवता करता येवू शकतो, असे गटनेत्यांनी सांगितले. याशिवाय जे स्टॉल्स यापूर्वी देण्यात आले आहेत,त्यांचे परवाना त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करून स्टॉल्स हस्तांतरीत करण्याचाही निर्णय घेत गटनेत्यांच्या सभेत फेरविचारासाठी पाठवण्यात आले आहे. याबरोबरच २००९ च्या कामगार भरतीमध्ये प्रतीक्षा यादीवरील जे कामगार आहेत त्यांना यापूर्वीच्या गटनेत्यांच्या सभेमध्ये सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचप्रमाणे याची अंमलबजावणी करण्यात यावी अशाप्रकारे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.