राज्यभरात कोरोनाचा संसर्ग फैलण्यास पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. तर राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्राकडून कोणताही निधी मिळत नाही, किंवा तो वेळेत मिळत नाही अशी ओरड सुरू असल्याचे पाहायला मिळाले, मात्र कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र अर्थात मोदी सरकारने दिलेला निधी महाराष्ट्र सरकारकडून खर्चच करण्यात आला नाही, अशी माहिती पीआयबीने दिली आहे.
अवघे ०.३२ टक्के निधीच खर्च
दरम्यान, पीआयबीने दिलेल्या आकडीवारीनुसार, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासाठी प्रस्तावित १ हजार २९४ कोटी दिले होते. त्यातले केंद्राने राज्य सरकारला ६८३ कोटी दिले. १ हजार २९४ कोटींपैकी २ कोटी २२ लाख खर्च करण्यात आले. म्हणजे अवघे ०.३२ टक्के निधीच राज्य सरकारने खर्च केल्याचे पीआयबीने म्हटले आहे. त्यामुळे एवढा निधी देऊनही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खर्च का झाला नाही, असा प्रश्न विचारला जातोय.
(हेही वाचा – कोरोनावर उपचार करणारेच ‘कोरोना’च्या विळख्यात…)
कोणता राज्यातील किती निधी मिळाला
- महाराष्ट्र – १,२९४ कोटींपैकी २ कोटी २२ लाख खर्च
- दिल्ली – ५०.३४ कोटींपैकी ३४.९२ कोटी खर्च
- पंजाब – १६५ कोटींपैकी १४४.९३ कोटी खर्च
- तामिळनाडू – ३९९.६६ कोटींपैकी ३२५.४८ कोटी खर्च
- पं. बंगाल – ५०३.८२ कोटींपैकी २६७.६९ कोटी खर्च