२०२१ मध्ये अवकाळी पावसाने थंडीच्या मोसमात हजेरी लावली होती. यंदाच्या वर्षात सुद्धा पहिल्याच महिन्यात हवामान विभागाने राज्यातील काही भागात यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात काही ठिकाणी ६ ते ९ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवार, ८ जानेवारी रोजी बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रविवार ९ जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. ६ आणि ७ जानेवारीला राज्यात कोणत्याच भागात यलो अलर्ट जारी केलेला नाही.
( हेही वाचा : कोविड रुग्ण वाढीची लांब उडी : दिवसभरात १५ हजार रुग्ण )
मध्यम सरींचा पाऊस
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला नसला, तरी अहमदनगर, जालना, हिंगोली, लातूर उस्मानाबाद, बीड, नंदुरबार, जळगाव, धुळे, पालघर, ठाणे, औरंगाबाद, नांदेड व हिंगोली या भागात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
Join Our WhatsApp Communityउत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम;राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता & काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस: 6 – 9 जानेवारी
6 धुळे,नंदुरबार
7 धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,अहमदनगर
8 ठाणे पालघर व उत्तर महाराष्ट्र,विदर्भातील काही भाग
9 मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग
– IMD pic.twitter.com/RS8FiSaxAC— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2022