पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमध्ये फिरोजपूर येथे जनसभेला संबोधित करण्यासाठी जात असतानाच त्यांचा ताफा आंदोलनकर्त्यांनी अडवला. २० मिनिटे पंतप्रधान रस्त्यात अडकून राहिले, सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान माघारी फिरले. यामुळे काँग्रेसचे कारस्थान अपयशी ठरले. जर मोदी तसेच पुढे गेले असते, तर दंगल घडविण्यात येणार होती, मोदींवर हल्ला होणार होता, असा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडिओ भाजपने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून प्रसारित केल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी जेंव्हा सभा रद्द करून परत फिरले आणि भटींडा विमानतळावर पोहोचल्यावर विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा की, मी जिवंत विमानतळावर पोहोचलो. मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता, यावर चर्चा सुरू झाली. मात्र काँग्रेसने हा दावा फेटाळून लावत, सभास्थळी गर्दी जमली नाही म्हणून मोदी थातुरमातुर कारण देत माघारी फिरले, असे सांगत होती. परंतु बुधवारी रात्री उशिरा जेव्हा भाजपने २ मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला तेव्हा मोदींच्या वक्तव्यामागील सत्यता उजेडात आली आहे.
समझिए प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी पर हमले की क्रोनोलॉजी… pic.twitter.com/SsjtLPKd3j
— BJP (@BJP4India) January 5, 2022
काय दावे केले आहेत या व्हिडिओमध्ये?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेस पक्षाचा डाव हाणून पाडला आहे. तसेच देशात दंगली घडवून आणण्याची काँग्रेसची योजना यातून उघड झाली आहे, असा खळबळजनक दावा भाजपने त्या व्हिडीओत केला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ल्याची क्रोनोलॉजी! मोदींवर हल्ला करण्याचा नेमका कुणाचा कट होता? खालिस्तानींचा? त्यांच्या या पूर्ण कटात त्यांना कुणाची साथ होती? काँग्रेसची? असा खडा सवाल करण्यात आला आहे.
- आधी 4 जानेवारीला कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली गेली. त्यानंतर 5 जानेवारीला मोदींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांना धमकविण्यात आलं. गाड्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजपच्या झेंडा फाडण्यात आल. मोदींच्या रॅलीत गाड्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजपच्या झेंड्यांसोबत छेडछाड केली. त्यानंतर गाड्यांवरील पोस्टर हटवले. हे सर्व प्रसंग या व्हिडिओत दाखवण्यात आले.
- 5 जानेवारीला आधी मोदींना रस्ता साफ असल्याचं क्लियरन्स दिलं. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना रस्त्यामध्ये घुसवलं. पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटांपर्यंत रोखण्यात आला. पंजाब सरकारशी संपर्क केला तर मुख्यमंत्री चन्नी यांनी बातचीतदेखील केली नाही, असेही या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.