तुम्हाला माहितीये का? यापूर्वीही बऱ्याचदा झाली पंतप्रधानांची सुरक्षा भंग!

113

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. पंतप्रधानांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकात जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तास आधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते, त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.

पण, पंतप्रधानांच्या सुरक्षेत आताच त्रुटी आढळल्या आहेत असे नाही, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अशा आहेत नजीकच्या काळात घडलेल्या  काही घटना…

  • फेब्रुवारी 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात अशोक नगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवेळी प्रचंड ढकलाढकली होऊन मोदींना त्यांचे भाषण थांबवावे लागले होते. गर्दीतील लोक बॅरिकेड तोडून व्यासपीठाकडे जाऊ लागल्याने मोदींना सभेच्या ठिकाणाहून बाहेर नेण्यात आले.
  • मे 2018 मध्ये पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यालयाच्या पदवीदान समारंभात मोदींचा चाहता असल्याचे सांगणा-या एका व्यक्तीने पंतप्रधानांच्या सुरक्षा कडे भेदले होते.
  • डिसेंबर 2017 मध्ये नोएडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जात असताना, ताफ्याच्या पुढे असलेल्या दोन पोलीस अधिका-यांनी चुकीचे वळण घेतल्याने ताफा दोन मिनीटे रहदारीमध्ये अडकून पडला होता. या घटनेनंतर संबंधित पोलीस अधिका-यांना निलंबीत करण्यात आले होते.
  • डिसेंबर 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी हजर असताना, भाजपचा एक कार्यकर्ता अचानक व्यासपीठावर चढत मोदींपासून काही मीटर अंतरापर्यंत पोहोचला. दुस-या एका भाजप नेत्याने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तीन पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

( हेही वाचा :पंजाबमध्ये काॅंग्रेस सत्तेच्या लायक नाही, कॅप्टन अमरिंदर सिंग भडकले )

  • डिसेंबर 2010 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग केरळ दौ-यावर असताना, त्यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर अचानक एक खासगी मोटार घुसली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाली होती. पोलिसांनी त्या मोटारला तात्काळ रस्त्यावरुन दूर केले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.