सामाजिक जाणिवेतून साजरा केला वाढदिवस

252

शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्यांना वाढदिवस म्हटले की, जंगी पार्टी करावीशी वाटते, पण गरिबांचे काय? रुग्णांचे काय? त्यांचे प्रश्न समजून कोण घेते? हेच सामाजिक भान जपण्याबरोबरच इतरांमध्ये जाणीव निर्माण व्हावी, यासाठी महिमा संतोष आडविलकर हिने यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसोबत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृती बरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्त्य पद्धतींनी घेतली. मात्र या परंपरेला फाटा देत महिमाने मुंबईच्या परेल परिसरातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना स्नॅक्स बॉक्स, पाणी, ज्युस व केक देऊन आपला वाढदिवस आनंदाने साजरा केला.

(हेही वाचा कोरोनाबाधित आहात तर परस्पर खाजगी रुग्णालयात जाऊ नका! कारण…)

कॅन्सरग्रस्त रुग्ण नातेवाईकांसोबत वाढदिवस साजरा

त्यावेळी महिमा सांगत होती, ‘माझा वाढदिवस अाणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी माझ्या घरातल्यांनी हॉटेलमध्ये जाण्याची योजना आखली होती, पण माझ्या मनाला पटत नव्हते. म्हणूनच कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत वाढदिवस साजरा करण्याची माझी कल्पना आई (कांचन) आणि (संतोष) वडीलांना सांगितली आणि त्यांनी मोठ्या आनंदाने मान्य केलं.” त्याप्रसंगी मुंबई कॅटरींग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे आणि विनायक मुंज हेदेखील उपस्थित होते. त्यांनी महिमाला आणि तिच्या कुटुंबियांना शुभेच्छा देऊन या समाजभावने बद्दल महिमाचे अभिनंदन केले. सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून, आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. महिमाच्या वाढदिवसाच्या उपक्रमात मित्रपरिवारातील सर्वच जणांनी हिरिरीने सहभाग घेतला. तसेच अशाप्रकारेच भविष्यातदेखील वाढदिवस साजरा करणार असल्याची पुस्तीही जोडली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.