माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कारण विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीस यांचा डान्सिंग डॉल असा उल्लेख केला. त्यामुळे त्यांनी हा दावा दाखल केला आहे.
चव्हाण यांच्या या आक्षेपार्ह टीपण्णीमुळे अमृता फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलह बाहेर काढत ऐकरी भाषेत हल्ला चढवला आहे. सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता न्यायालयात जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण!, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी थेट विद्या चव्हाणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?
रश्मी ठाकरे यांना राबडी देवी यांची उपमा दिली हे बरे झाले. जर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती, तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरे यांची व्हाईट प्रतिमा नाही आहे हे तरी मला या ठिकाणी भाजपवाल्यांना सांगावे वाटते. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायको तक्रार करताना तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे काय काय गुण उधळले त्या विषयी जर ट्वीट केले, तर बरे होईल, असे विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.
Join Our WhatsApp Community