मुंबईतील पालिका रुग्णालयात रुग्णांसह पालिकेचे डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सलाही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. रुग्णालयातील आरोग्य कर्मचा-यांनाही लागण झाली असून त्यात कोविड सेंटरमधील कर्मचारी आणि अधिष्ठात्यांचा समावेश आहे. त्यामुळे गरज भासल्यास डॉक्टरांनाही तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कोविड सेंटरमध्ये सोय केली जाईल, अशी माहिती पालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
कोविड सेंटरमध्ये कोरोनाचा शिरकाव
मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. आंग्रे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. वांद्रे-कुर्ला कोविड सेंटरमधील एक डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांवर केंद्रातच कोरोनावर उपचार सुरु आहेत.
मुंबईतील निवासी डॉक्टारांमध्ये वाढतोय कोरोना
पालिकेच्या केईएम रुग्णालयात ८७, सायन रुग्णालयात ९८, कूपर रुग्णालयात ७ आणि नायर रुग्णालयात ४५ निवासी डॉक्टरांना तर जेजे समूह रुग्णालयातील ब्याण्णव निवासी रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
(हेही वाचा राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? काय आहे कारण…)
पालिकेची तयारी…
मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दुसरा माळाही कोरोनाबाधित डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावर उपचार देण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांना कोरोनावर उपचारासाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे.
राज्यातील ३७४हून अधिक निवासी डॉक्टर्स कोरोनाबाधित
मुंबईबाहेर लातूर आणि यवतमाळ सरकारी रुग्णालयात प्रत्येकी एका निवासी रुग्णाला कोरोना झाला. इतरत्र भागांतील प्रत्येक सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संख्या दहाच्या खाली दिसून आली. ठाणे आणि पुण्यातील सरकारी रुग्णालयात प्रत्येकी दहा निवासी डॉक्टरांना कोरोना झाला. जेजेतून दोन, कूपर रुग्णालयातून तीन आणि ठाणे सरकारी रुग्णालयातून एका निवासी डॉक्टराला कोरोनातील यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
Join Our WhatsApp Community