अखेर निर्बंध लागलेच! रात्री संचारबंदी! दिवसा काय असणार बंद? जाणून घ्या…

146

राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत आहे, परंतु तरीही सरकार निर्बंध का लावत नाही, अशी चर्चा सुरु होती, अखेर राज्य सरकारने हे निर्बंध लावले आहेत. रविवारी, रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल बंद असणार आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

(हेही वाचा मुंबईतील रुग्ण संख्या २० हजारांवर स्थिरावली)

काय सुरु आणि काय बंद? 

  • रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू
  • मैदानं, उद्यानं पर्यटनस्थळ बंद
  • शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  • थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
  • सलून आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं सुरु
  • पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं प्रवासास मुभा
  • हॉटेल, रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  • स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.