महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी पुणे प्रशासनाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी 28 जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुण्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
उद्घाटनं लांबणीवर पडणार
नरेंद्र मोदी पुणे यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन,दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापा पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन कऱण्यात येणार होते. नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने अनेक विकासकामांसह मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात नवे निर्बंध राज्य सरकारने जाहीर केले आहेत.
(हेही वाचा -अखेर निर्बंध लागलेच! रात्री संचारबंदी! दिवसा काय असणार बंद? जाणून घ्या…)
अखेर निर्बंध लागलेच
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
Join Our WhatsApp Community