आतापर्यंत रेल्वे स्टेशनवर आपल्याला फक्त रेल्वेचे तिकीट किंवा आरक्षण तिकीट मिळत होते. मात्र आता रेल्वे स्टेशनवर आधार, पॅनकार्ड, तिकीटासह विमाही काढता येणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण आता लवकरच सामान्यांना रेल्वेस्थानकावर आधार व मतदान कार्ड तयार करून मिळण्याची सुविधा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाची कंपनी रेलटेल संपूर्ण भारतात रेल्वेस्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करणार आहे.
ही योजना सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड (सीएससी एसपीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारा चालवली जाते. यामुळे रेल्वेस्थानकांवर येणाऱ्यांना ट्रेन, बस यांच्या तिकीट बुकिंग, आधार कार्ड, मतदान कार्ड, मोबाइल रिचार्ज, वीजबिल भरणा, पॅन कार्ड, बँकिंग, विमा यांच्यासह अनेक सुविधा मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व्हिस सेंटर ग्रामस्तरीय उद्योजकांमार्फत चालवली जाणार आहे. वाराणसी रेल्वेस्थानक आणि प्रयागराज रेल्वेस्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहेत. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होत असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा-बापरे! संसद भवनात कोरोनाचं थैमान; ४००हून अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह)
6,090 स्थानकांवर दिली वायफाय सेवा
200 हून अधिक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये दक्षिण मध्य रेल्वेवरील 44, ईशान्य रेल्वे स्थानकांवर 20, पूर्व मध्य रेल्वेवरील 13, पश्चिम रेल्वेवरील 15, उत्तर रेल्वेवरील 25 आणि पश्चिम मध्य रेल्वेवरील 12 स्थानकांचा समावेश आहे. यासोबतच 13 पूर्व आणि 56 ईशान्य रेल्वेवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. RailTel ने देशभरातील 6090 स्थानकांवर सार्वजनिक वायफाय सेवा प्रदान केली आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठ्या वाय-फाय नेटवर्कपैकी एक बनले आहे.
Join Our WhatsApp Community