जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना लहान मुलांमध्ये देखील कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहेत. अशा परिस्थितीत आता अमेरिकेतील एका संशोधनाने जगाच्या चिंतेंत वाढ केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 18 वर्षांखालील लहान मुलांना मधुमेह आजार होण्याचा अधिक धोका असल्याचा सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या एका संशोधनातून (CDC) समोर आले आहे. इतकेच नाही तर कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पटीने जास्त असल्याचे या अभ्यासातून उघड झाले आहे.
कोरोनातून बरे झालेल्या प्रौढांमध्ये मधुमेहाचा धोका
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये टाईप एक किंवा टाईप दोन मधुमेह होण्याचा धोका सर्वाधिक वाढला आहे. काही अभ्यासानुसार, कोरोनातून बरे झालेल्या प्रौढांमध्ये मधुमेहाचा धोका वाढलेला दिसून आला आहे. युरोपमधील संशोधकांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून टाईप एक मधुमेहाचे निदान झालेल्या मुलांची संख्या वाढल्याचे नोंदवले आहे. सीडीसी संशोधन युनायटेड स्टेट्समधील डेटाबेसचे परीक्षण करणारे पहिले संशोधन आहे.
(हेही वाचा –काय सांगताय! आता रेल्वे स्टेशनवर आधार, पॅनकार्ड, तिकीटासह विमाही काढता येणार)
अशा मुलांचे झाले परीक्षण
18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशा मुलांमध्ये मधुमेहाचे नवीन निदान किती आहे याचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात 18 वर्षाखालील मुलांमध्ये झालेल्या मधुमेहाचे निदान पाहण्यासाठी यू.एस. आरोग्य योजनांतील दोन दाव्यांची माहिती वापरून ज्यांना कोविड आहे त्यांच्याशी तुलना केली गेली. यानंतर नवीन मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये 2.6 पटीने वाढ आढळून आली आहे.
Join Our WhatsApp Community