प्रत्येकालाच नवनवीन ठिकाणी फिरायला जायला आवडते. सुट्ट्या आल्या की, मुंबईतील बरेच लोक एक-दोन दिवसाच्या सहलीची योजना करतात. प्रवासापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. यामुळे प्रवासादरम्यान तुमच्या पैशांची नक्कीच बचत होईल आणि तुमचा प्रवासही सुखकर होईल.
( हेही वाचा : ट्रकच्या धडकेत लातूर-औरंगाबाद बसचा चक्काचूक, ६ जण ठार ८ गंभीर )
- ट्रेनने प्रवास करा – पैसे वाचवण्यासाठी ट्रेनने प्रवास करणे हा एक चांगला मार्ग आहे. खरं तर, इतर वाहतुकीच्या तुलनेत ट्रेनने प्रवास करण्याचे बरेच फायदे आहेत. कारण त्यात तुम्ही आराम करू शकता, अनेक ठिकाणच्या प्रेक्षणीय दृश्यांचा आनंद घेऊ शकता, इतर प्रवाशांशी गप्पा मारू शकता आणि मुख्य म्हणजे ही वाहतूक इतर कोणत्याही साधनांपेक्षा कमी खर्चिक आहे.
- सार्वजनिक वाहतूक – प्रवासादरम्यान विशेषत: एकट्याने प्रवास (Solo Travel) करताना, सार्वजनिक वाहतूक जास्त सोयीची ठरते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बस, रिक्षा, लोकल ट्रेन, ऑटो आणि मेट्रो इत्यादीचा वापरू शकता.
- स्थानिक पदार्थ – प्रवासादरम्यान चांगले खाणे आणि बजेटमध्ये खाणे प्रत्येक वेळी सोपे नसते. अशावेळी तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्ट्रीट फूडचा आस्वाद घेऊ शकता. स्ट्रीट फूडमुळे पैसे वाचविण्यास मदत होते.
- सहलीचे नियोजन करा – जर तुम्ही बजेटमध्ये नियोजन करत असाल तर आगाऊ सहलीचे नियोजन सुरू करा. हॉटेल्स- ठिकाणाबद्दल माहिती मिळवा आणि तिकीट वेळेत बुक करा. या सर्व गोष्टी शेवटच्या क्षणी करणे महागात पडू शकते. त्यामुळे आगाऊ सहलीचे नियोजन करा.
- ऑफ-सीझनची सहल – सार्वजनिक सुट्ट्या अथवा शनिवार-रविवारी प्रवास करणे टाळा, याउलट ऑफ-सीझन काळात प्रवास करा कारण, असे केल्याने पैशांची बचत होईल आणि लोकांची गर्दीही कमी असेल.