रविवारी राज्यात ४४ हजार ३८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यातुलनेत रविवारी केवळ १५ हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन घरी गेले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता राज्यात २ लाख २ हजार २५९ सक्रीय कोरोना रुग्ण उपचार घेत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याची नोंद आहे. रविवारी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्क्यांवर खाली घसरले. त्यातुलनेत मृत्यूदर खालावलेला नसल्याने बहुतांश कोरोना रुग्णांवर उपचार यशस्वी होत आहेत.
(हेही वाचा –चिंता वाढली! मुंबईपेक्षाही ‘या’ जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अधिक फैलाव)
राज्यात १२ कोरोनाबाधितांनी रविवारी आपला जीव गमावला. राज्यातील मृत्यूदर केवळ २.०४ टक्के नोंदवला जात आहे. राज्यात रविवारी कोरोनाच्या नव्या नोंदीत मुंबईत १९ हजार ४७४ रुग्ण आढळून आले. तर ठाणे मंडळात ३३ हजार २९९, नाशिक मंडळात १ हजार ४९७, पुणे मंडळात ६ हजार ९३३, कोल्हापूर मंडळात ५७५, औरंगाबाद मंडळात ३२१, लातूर मंडळात ३५५, अकोला मंडळात २४९, नागपूर मंडळात १ हजार १५९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली.
विलगीकरणावरच भर
राज्यात आता १० लाख ७६ हजार ९९६ जणांना घरी विलगीकरणात ठेवले आहे. तर २ हजार ६१४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्याची आतापर्यंतची आकडेवारी
राज्यात पहिल्या लाटेपासून आतापर्यंत कोरोनाचे ६९ लाख २० हजार ४४ रुग्ण आढळले आहेत. तर १ लाख ४१ हजार ६३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join Our WhatsApp Community