‘चूक झाली, मूर्खपणा झाला’: मोदींची ‘हत्या’ दाखवणाऱ्या YouTuber ने मागितली माफी, म्हणाला…

165

पंजाबमधील 20 वर्षीय युट्युबर मनप्रीत सिंग याने GTA व्हिडिओ गेममध्ये ग्राफिक्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘निर्दयी हत्या’ चित्रित केली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता यूट्यूबरने माफी मागितली आहे. तो म्हणाला की, मी फक्त व्हिडिओ गेमद्वारे विनोद करतो, परंतु ब-याच लोकांनी त्याला गंभीरपणे घेतले. या वादग्रस्त गेमचा व्हिडिओ त्याने त्याच्या ‘हॅपी गोल्डस्मिथ’ या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे.

व्हिडिओ शेअर करत मागितली माफी

मनप्रीत सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर तीन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आणि सांगितले की, आता त्याला समजले आहे की व्हिडिओ बनवणे ही त्याची चूक होती. चार महिन्यांच्या जुन्या व्हिडिओची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. त्या व्हिडिओमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर लोक मला मेसेज आणि कॉल करत आहेत, शिवीगाळ करत आहेत आणि धमक्या देत आहेत. माझ्याकडून चूक झाली हे मला माहीत आहे, असे सिंग याने स्पष्ट केले आहे.

सिंगचे स्पष्टीकरण

मी काही काळापूर्वीच गेमिंगचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आणि अजूनही शिकत आहे. असा व्हिडिओ बनवणे मूर्खपणा होता आणि त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण तो व्हिडिओ मी फक्त गंमत म्हणून तयार केला होता, तो विनोद होता. लोक हे गांभीर्याने घेतील हे मला माहीत नव्हते. तो एक जुना व्हिडिओ होता आणि त्याला सध्याच्या परिस्थितीशी जोडणे योग्य नाही. मी व्हिडिओ डिलीट केला आहे, असे स्पष्टीकरण सिंगने केले आहे. व्हिडिओपूर्वी मनप्रीतने ट्विटरच्या माध्यमातून माफीही मागितली होती.

जूना व्हिडिओ

पंजाबमधील बाघा येथील रहिवासी असलेल्या मनप्रीत सिंगने चार महिन्यांपूर्वी हा वादग्रस्त व्हिडिओ गेम अपलोड केला होता. त्याच्या यूट्यूब चॅनलचे सुमारे तीन लाख सबस्क्राइबर्स आहेत. तो अनेकदा त्याच्या चॅनलवर GTA5, Valorant आणि Farmer Simulator शी संबंधित स्ट्रीमिंग व्हिडिओ अपलोड करतो. त्याच्या व्हिडिओंमध्ये तो पंजाबी भाषेत कॉमेंट्री करतो.

हा व्हिडिओ खरचं हास्यास्पद आहे का?

डिलिट केलेल्या व्हिडिओमध्ये सिंगने म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या सेवेत असणारे पोलीस आज आमच्यासोबत कटात शामील आहेत. मोदींना वाटतेय की पोलीस त्यांचे रक्षण करतील, पण ते चुकीचे आहे. या व्हिडिओमध्ये त्याने दाखवलयं की, कसे त्यांचे काही आंदोलक मोदींचा रस्ता अडवतात आणि त्यांना धडा शिकवण्याची योजना आखतात. त्यानंतर व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आले आहे की, मोदींची गाडी पुढे गेल्यानंतर आंदोलनकारी कसा त्यांच्या गाडीचा पाठलाग करतात आणि मोदींच्या गाडीला लोखंडाच्या साखळीने बांधतात, त्यानंतर मनप्रीत नावाचं कॅरेक्टर त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडतो. तसेच, गाडीच्या काचेला तोडण्यासाठी हाथोडीचा वापर करतो. त्यानंतर तो व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो की, मोदींना बाहेर येऊ द्या मी त्यांना धडा शिकवतो. त्यातच पंतप्रधान मोदींचं कॅरेक्टर गाडीतून खाली उतरते ते खाली उतरताच त्यांच्यावर बेसबाॅल ने हमला केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात हसण्यासारखी कोणतीच गोष्ट नव्हती, तर मग सिंग हा एक हास्यास्पद व्हिडिओ असल्याचं कसं काय म्हणू शकतो?

( हेही वाचा: ‘आई-वडिलांचा घटस्फोट झाला तरी मुलीचं शिक्षण, लग्न वडिलांचीच जबाबदारी’ )

वादग्रस्त व्हिडिओवर मनप्रीत सिंग आनंदी होता

मनप्रीत सिंग, ज्याने नुकताच वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला आहे, त्याने यापूर्वी  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर कसा व्हायरल होत आहे हे बघून आनंद व्यक्त केला होता. यासोबतच त्याने दावा केला होता की, वादात असूनही तो आपला व्हिडिओ हटवणार नाही. मोदी समर्थकांसाठी अपशब्द वापरत त्याने ‘हा एक खेळ होता’ आणि ‘खूनी मोदी भक्त आ गये’ असेही म्हटले होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.