मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेले विमान पेटले असते, पण…

130

मुंबई विमानतळावर सोमवारी एक मोठा अपघात होताना वाचला, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे विमान जिथे उभे होते, त्या विमानाला आग लागली असती पण सुदैवाने तसे घडले नाही.

आग विमानापर्यंत पोहोचली असती तर…

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी एअर इंडियाच्या AIC-647 विमानाला पुशबॅक देणार्‍या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते. या आगीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये तातडीने धावपळ सुरु झाली. विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. एअर इंडियाच्या या विमानात 85 प्रवासी बसले होते. पुशबॅक ट्रॅक्टरला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.  ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आग लागली तेव्हा ही ट्रॉली विमानाच्या अगदी जवळ होती. सुदैवाने आग विमानापर्यंत पोहोचली नाही. आग विमानापर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. ट्रॅक्टरला ही आग कशी लागली याचा तपास सध्या सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

(हेही वाचा एसटी संप : शरद पवारांच्या बैठकीनंतर काय म्हणाले कामगार नेते?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.