जे जे रुग्णालयात औषधाचा तुटवडा! नडली पैशांची थकबाकी

130

राज्याच्या सरकारी रुग्णालयाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईतील जे जे समूह रुग्णालयात आर्थिक थकबाकीमुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या आठवड्याची औषधाची तजवीज कशीबशी रुग्णालय प्रशासनाने पूर्ण केली असली तरीही त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे तशीच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमदार एड राहुल नार्वेकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना ८ जानेवारी रोजी पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केल्यानंतर संबंधित घटना समोर आली. २०२०-२१ साली नोंदणी झालेल्या औषध साठ्यापैकी केवळ ३० टक्के औषध साठाच रुग्णालयात उपलब्ध झाला असल्याचे पत्रात अधोरेखित करण्यात आले.

जे जे रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे

  • एन्ट्रानील
  • सायट्रेट इंजेक्शन
  • अमोक्सीन क्लॅव्ह इंजेक्शन
  • अन्टीस्नेक व्हेनम
  • हेपॅटायटीस बी
  • इन्युनीग्लोबीन
  • पॅरोसेटामॉल
  • स्टराईल वॉटर तसेच कोरोना उपचारासाठी आवश्यक औषधेही नाही.

औषध पुरवठादार संतापले

गेली अनेक वर्ष औषध पुरवठादारांचे थकीत देय दिलेले नाही. औषधांचा साठा सरकारच्यावतीने ९० टक्के हाफकिन तर १० टक्के संबंधितांकडून भरला जातो. मात्र जेजे रुग्णालयाने स्वतःच्या नोंदीतील १० टक्क्यांच्या आर्थिक व्यवहारातूनही पैशाची देय रक्कम दिलेली नाही, अशी माहिती औषध पुरवठादारांकडून दिली गेली.

(हेही वाचा-गटविमा नाहीच, वैयक्तिक आरोग्य विमाच घ्या! ना १५ हजार, ना २० हजार, बारा हजारच देणार)

बुस्टर डोस उद्धाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख जेजेत

सोमवारी देशभरात आरोग्य सेवा कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस देण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. राज्यातील या उपक्रमचे उद्घटान वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी जेजे रुग्णालयात केले. मात्र याबाबत जेजे रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसल्याचे समजते. जेजे समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रणजीत मणकेश्वर कोरोनाबाधित असल्याने त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.