सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना धमक्यांचे फोन! म्हणाले, मोदींच्या…

158

सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकिलांना सोमवारी धमकीचे फोन आले. कॉलमध्ये, वकिलांना 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित प्रकरणावर सुनावणी न करण्यास सांगण्यात आले. अमेरिकेतील ‘शीख फॉर जस्टिस’चा जनरल काउंसिल असल्याचा दावा करणाऱ्या कॉलरने सांगितले की, गेल्या आठवड्यात पंजाबच्या हुसैनवाला फ्लायओव्हरवर पीएम मोदींना थांबवण्यात आले त्यासाठी शीख फाॅर जस्टीस जबाबदार आहे. विशेष म्हणजे, भारताच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ फोन येण्याच्या काही वेळापूर्वी, सुरक्षा त्रुटीशी संबंधित एका जनहित याचिकांवर सुनावणी करणार होते.

सुनावणी होता कामा नये 

1984 च्या शीखविरोधी दंगलीतील दोषींना शिक्षा सुनावता आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करू नये, असे कॉलरने म्हटले आहे. कॉल प्राप्त झालेल्या अनेक वकिलांनी सांगितले की, हा एक स्वयंचलित पूर्व-रेकॉर्ड केलेला कॉल आहे आणि तो नंबर युनायटेड किंगडमच्या बाहेरचा आहे. “मला +447418365564 क्रमांकावरून कॉल आला, डिस्प्लेमध्ये युनायटेड किंगडममधून आलेला कॉल दिसत होता. काही रेकॉर्डेड मेसेज होता. त्यात दावा करण्यात आला होता की, मोदींच्या ताफ्याला अडवण्याची जबाबदारी शीख फाॅर जस्टीस या संस्थेने घेतली आहे, असं व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एका वकिलाने सांगितले आहे.

( हेही वाचा: ओमायक्रॉनच्या चाचण्या घटल्या! कारण वाचून थक्क व्हालं…)

शीख दंगल लक्षात ठेवा

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी 1984 च्या हत्याकांडाची आठवण ठेवावी, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही, असे देखील काॅलद्वारे सांगण्यात आले आहे. इतर अनेक वकिलांनी सांगितले की, त्यांनाही असेच फोन आले होते. दरम्यान, सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.