देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशातील बड्या नेत्यांपासून अनेक कलाकारांना कोरोना संसर्ग झाला आहे. दरम्यान, भारतरत्न आणि सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकरही कोरोनाच्या विळख्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
आयसीयूमध्ये दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. लता मंगेशकर यांची भाची रचना हिला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
( हेही वाचा: कहरच ना राव! कर्ज दिलं नाही म्हणून पठ्यानं चक्क बँकच पेटवली )
"She is doing fine; has been kept in ICU only for precautionary reasons considering her age. Please respect our privacy and keep Didi in your prayers," singer Lata Mangeshkar's niece Rachna to ANI
— ANI (@ANI) January 11, 2022
मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा
लता मंगेशकर यांचे वय लक्षात घेता, त्यांना सध्या अतीदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना हिने केली आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून प्रार्थना केली जात आहे. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला होता. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community