चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना सापडला पहिला पुरावा!

171

चंद्रावर पाणी आहे का? याबाबतचं कुतुहल सातत्याने व्यक्त केले जाते. पण आता, चीनच्या चॅंग ५ या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या लॅंडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा पहिला पुरावा सापडला आहे.

सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात याबाबतचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये १२० पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे. तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये १८० पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे. सौर वाऱ्यांमुळे चंद्रावर आर्द्रता वाढते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

( हेही वाचा : कहरच ना राव! कर्ज दिलं नाही म्हणून पठ्यानं चक्क बँकच पेटवली )

चंद्रावरील पाण्याचे पुरावे

चांद्रभूमीवरील मातीमध्ये आद्र्रता आढळण्यास प्रामुख्याने सौर वारे कारणीभूत ठरत असतात. कारण या वाऱ्यांमधील हायड्रोजनपासून पाणी तयार होते, असे चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस) च्या संशोधकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय खडकांमध्ये आढळणारे अतिरिक्त ६० पीपीएम पाणी हे चांद्रगर्भातून येत असावे, असा त्यांचा दावा आहे. चीनचे चँग-५ हे अवकाशयान चंद्रावरील सर्वांत कमी आयुर्मान असलेल्या एका बेसाल्ट खडकावर उतरविण्यात आले आहे. या यानाने १,७३१ ग्रॅम वजनाचे मातीचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. यान ज्याठिकाणी उतरले त्याच ठिकाणी पाण्याचे पुरावे सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. यानंतर चीनचे चॅंग ६ आणि चॅंग ७ हे दोन लॅंडर अधिक प्रगतशील तंत्रज्ञानाने अवकाशात दाखल केले जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.