हुश्श! आता लवकरच ओमायक्रॉनवर मात करता येणार, कसं ते वाचा…

135

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने जगभरात आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. तर ओमायक्रॉनमुळे लसीकरण पूर्ण करणाऱ्या रुग्णांच्या जिवाला अधिक धोका नसल्याचं जरी समोर आले आहे. देशात या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता काही देशानी त्यांच्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात केली आहे. दिलासादायक म्हणजे काही देशांनी ओमायक्रॉनविरोधी लसींवर देखील काम करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, लस उत्पादन करणाऱ्या दिग्गज फायझर फार्मा कंपनीने ओमायक्रॉनविरोधातील लस मार्चमध्ये तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही माहिती फायझर कंननीचे सीईओ यांनी सोमवारी जाहीर केली.

सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीची मागणी

फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बौर्ला यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना असे सांगितले की, कोरोना बाधित रुग्णसंख्येत सतत्याने वाढ होत असताना सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीची मागणी होत आहे. त्यामुळे फायझरकडून जास्ताीत जास्त प्रमाणात लसीचे डोस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा –ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात आता डुकराचं ह्रदय धडधडणार!)

बूस्टर डोसमुळे गंभीर परिणामांपासून संरक्षण

यापुढे बौर्ला यांनी असेही म्हटले की, ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवणारी लस येत्या मार्चपर्यंत तयार होईल. भविष्यात ही लस कशी वापरली जाईल, या सगळ्याच गोष्टी सध्या अनिश्चित स्वरुपात आहेत. ती लस कशी वापरली जाईल हे मला माहीत नाही. तर कोरोनाच्या दोन लसींचे डोस असणारी व्यवस्था आणि एक बूस्टर डोस हा ओमायक्रॉनमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटला थेट लक्ष्य करणारी लस स्ट्रेनच्या ब्रेकथ्रू इंफेक्शनपासून देखील संरक्षण करेल, जी अत्यंत संसर्गजन्य असल्याचे सिद्ध झाले असल्याचे फायझरच्या सीईओने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.