बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौहर अनेक मुद्द्यांवर आपले मत अगदी मांडत असते. ट्रोलर्सला प्रत्युत्तर द्यायचे असो किंवा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित काही अपडेट्स द्यायचे असो, गौहर ट्विटर किंवा इंस्टाग्रामची मदत घेते. आता नुकतेच गौहरने ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजेच समान नागरी संहिता कायद्याबद्दल (यूसीसी) आपले मत व्यक्त केले आहे. मी मुस्लिम आहे आणि मुस्लिमांना त्यांच्या अधिकारांपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, असे या अभिनेत्रीचे मत आहे.
असं आहे यूजरचं ट्विट
खरं तर, गौहरने आशा जडेजा मोटवानी नावाच्या भारतीय-अमेरिकन उद्योजक महिलेच्या ट्विटला उत्तर दिले आहे, ज्यामध्ये आशा हिने भारतात ‘समान नागरी संहिता’ लागू करण्याबद्दल सांगितले आहे. आशाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘बाहेरील लोकांना हे माहित नाही की भारतात अजूनही हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगळे कौटुंबिक कायदे आहेत. हिंदूंना धर्मनिरपेक्ष कायद्याचे पालन करावे लागते. तर मुस्लिम मात्र शरियाच्या नावाखाली 4 बायका ठेवू शकतात, तसेच आपल्या बायकोला आणि मुलींना शिक्षणापासून वंचित ठेऊ शकतात. युनिफाॅर्म सिविल कोड म्हणजे यूसीसी सर्व भारतीयांसाठी लागू केले जावे. आशाने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे.
Outside world doesn’t know that India still has separate family laws for Hindus&Muslims. Hindus have to abide by secular code. Muslims can have 4 wives &ban education for their wives &girls in name of Sharia. #UniformCivilCode has to apply to ALL Indians. @PMOIndia @narendramodi
— Asha Jadeja Motwani 🇮🇳🇺🇸 (@ashajadeja325) January 8, 2022
भडकली गौहर
गौहरने आशाच्या या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. या ट्विटला प्रत्युत्तर देताना अभिनेत्रीने लिहिले, ‘अरे लूजर! मी मुस्लिम आहे आणि मला माझ्या अधिकारांपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. त्यामुळे अमेरिकेत तुमचे आरामशीर जीवन जगा आणि माझ्या देशात द्वेष पसरवणे थांबवा, असं ट्विट करत गौहरने समान नागरी संहिता कायद्याला विरोध केला आहे.
( हेही वाचा:‘जनपथा’वर झळकणार महाराष्ट्रातील क्रांतीकारकांची शौर्यगाथा! )
Hey loser ! I’m a Muslim , and no body can ban us from having our rights , india is secular, it’s a democracy, not a dictatorship like u would desire ! So stay put in the comfort of your American status , n stop inciting hate in my country ! https://t.co/wvTTA8ZLMe
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) January 9, 2022
तू मुस्लिम धर्म स्वीकार
गौहर खान अभिनेता कुशल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांच्या ब्रेक अपचे कारण देताना, कुशल टंडनने सांगितले होते की, गौहर खानसोबत नेहमीच धर्मावरून भांडण होत असे. कुशलने धर्मांतर करून मुस्लिम व्हावे, अशी गौहर खानची इच्छा होती. परंतु, त्याने इस्लाम न स्वीकारल्यामुळे हे नाते तुटले. हे दोघे 2013मध्ये ‘बिग बॉस 7’ मध्ये एकत्र आले होते. पण, गौहर खानच्या कट्टरवादी इस्लामिक विचारसरणीमुळे हे नाते तुटल्याचे स्वतः कुशल टंडनने सांगितले होते.
Join Our WhatsApp Community