जानेवारीत दाखल झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईचे तापमान ३ अंशांनी घसरले होते. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने बुधवार, १२ जानेवारी रोजी १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले आहे. तर कुलाबा वेधशाळेने १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले आहे. संपूर्ण राज्यभरात थंडीची लाट असताना, विदर्भात मात्र हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाकडून १२ ते १४ जानेवारी दरम्यान विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर या २ दिवसात मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
( हेही वाचा : रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर… )
१२ जानेवारी:
विदर्भात १२- १४ जानेवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता, गडगडाटासह.
मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता ह्या २ दिवसात.
– IMD pic.twitter.com/sHEpotAVfh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 12, 2022
राज्यातील किमान तापमान
राज्यातील किमान तापमानाची नाशकात सलग तिसऱ्या दिवशी नोंद झाली. तापमान पुढील आठवडाभर सामान्य राहील, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली आहे.
राज्यात बुधवारी नोंदवलेले तापमान
- मुंबई (सांताक्रुझ) १४.४
- मुंबई (कुलाबा) १६.२
- रत्नागिरी १५.५
- डहाणू १४.१
- पुणे ११.४
- बारामती १२.९
- मालेगाव १२.२
- अहमदनगर १४
- जळगाव १२.२
- माथेरान १३.२
- चिकलठाणा ११.६
- नाशिक १०.३
- सांगली १२.१
- सातारा १२
- जालना १२.४