पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री काय करणार मागणी? राजेश टोपे म्हणाले…

145

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, त्यावेळी महाराष्ट्राला लसींचा तुटवडा असल्याचे कळवण्यात येणार आहे. या बैठकीत कोवॅक्सीन लस कमी पडत आहे, त्याचा पुरवठा करण्याची मागणी करणार आहे. कारण अधिकाधिक जणांना कोवॅक्सीन देण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. त्यामुळे ५० लाख कोव्हीशील्ड आणि ४० लाख कोवॅक्सीन लस उपलब्ध करून देण्यासाठी मागणी आम्ही पंतप्रधानांना करणार आहे, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

घरी चाचणी केली तरी रिपोर्ट कळवा…

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या कमी होते, हे चुकीचे आहे. कारण राज्यात बुधवारी ४६ हजार नवे रुग्ण सापडले आहेत, हा २१.४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. हे आकडे पाहून घाबरू नका, कारण जरी रुग्ण संख्या वाढली, तरी त्यातील ८६ टक्के लोक घरीच उपचार घेत आहेत, उर्वरित १४ टक्के रुग्ण हे रुग्णालयात आहेत. त्यातील आयसीयूमध्ये ०.९१ टक्के, व्हेंटिलेटर ०.३२ आणि उर्वरित ऑक्सिजन बेडवरील असे मिळून केवळ २.८ टक्के रुग्ण गंभीर आहेत, तर मृत्यूचे प्रमाणही किंचित वाढले आहे. मुंबई आणि राज्याची आरटीपीसीआर चाचण्या २ लाख करण्याची क्षमता आहे, त्या क्षमतेने आपण चाचण्या करत आहोत. याउपर झटपट चाचण्या करत आहेत. अनेक जण परस्पर चाचणी करत आहे, मात्र ते पॉझिटिव्ह आले, तर कळवत नाहीत, पण त्यांनाही उपचार करण्याचे आदेश दिले आहेत, स्वतः चाचणी केली आणि पॉझिटिव्ह आले, तर संबंधितांनी कृपया सरकारी यंत्रणेला कळवावे, जेणे करून तुम्हाला मदत केली जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

(हेही वाचा विदर्भात यलो अलर्ट, तर नाशिक सर्वाधिक थंड!)

लसीकरणाचा दर घसरला

लसीकरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. लसीकरणाचा दर कमी होताना दिसत आहे, हे होता काम नये. दररोज साडे सहा लाख लसीकरण होत होते, ते प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. कार्यालयात डबल व्हॅक्सिनेशन अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. एक लस घेतलेले ९० टक्के आहेत, तर दोन लस घेतलेले ६२ टक्के आहेत. हे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्र हे मार्गदर्शक राज्य आहे हे प्रमाण अधिक असले पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.