ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांना न्यूमोनियाचेही निदान

128

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (९२) यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याने त्यांच्या घराजवळील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत मंगळवारी दीदींच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताच ही बाब उघडकीस आली. बुधवारी रुग्णालय प्रशासनाने मंगेशकर यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याची माहिती दिली.

लताताईंना अतिदक्षता विभागात ठेवले

लता मंगेशकर यांच्या नातेवाईकांनी त्यांना कोरोनाची लागण झाली असून ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. मंगेशकरांच्या उपचारांबाबत माहिती देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम लतादीदींच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनासह त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. लता मंगेशकर यांना बारा दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लता मंगेशकर यांना शनिवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

( हेही वाचा : विदर्भात यलो अलर्ट, तर नाशिक सर्वाधिक थंड! )

मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा

लता मंगेशकर यांचे वय लक्षात घेता, त्यांना सध्या अतीदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती लता मंगेशकर यांची भाची रचना हिने केली आहे. लता मंगेशकर यांच्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून प्रार्थना केली जात आहे. आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला होता. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.