भारताचे यशस्वी उद्योजक, भारतातील प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित तसेच टाटा समूहाचे अध्यक्ष ज्यांनी आजपर्यंत लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले. सोबतच जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली त्या रतन टाटांचा जीवनपट लवकरच पुस्तकरुपात जगासमोर येणार आहे. आजवर जगासमोर न आलेले रतन टाटा पुस्तकातून भेटीला येणार असल्याने, उद्योगजगतासह जगभरातील वाचकांची उत्कंठा वाढली आहे.
जागतिक स्तरावर प्रकाशन
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे जीवनचरित्र नोव्हेंबर 2022 मध्ये प्रकाशित होणार आहे. प्रकाशनाचे हक्क ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशन संस्थेला मिळाले आहे. निवृत्त सनदी अधिकारी थॉमस मॅथ्यू यांनी ‘रतन टाटा : द ऑथोराईज्ड बायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. 2018 साली मॅथ्यू यांनी चरित्रलेखनाला सुरुवात केली होती. जागतिक स्तरावर या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती प्रकाशन संस्थेने दिली आहे.
( हेही वाचा :धक्कादायक! ‘सेल्फ कोरोना टेस्ट किट’च्या रुग्णांची महापालिकेकडे नोंदच नाही )