केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेंगळुरूमधील तारबनाहली गावात नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून सुमारे 50 लाख रुपये किमतीचा माल सापडला आहे, ज्याचा वापर हा व्यक्ती घरी ड्रग्ज बनवण्यासाठी आणि विक्रीसाठी करत होता. परदेशी लोकांकडून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करणे हा आता नवीन गुन्हा राहिलेला नाही. परदेशातून, प्रामुख्याने आफ्रिकन देशांतून येणारे अनेक लोक मुंबई, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ड्रग्जची तस्करी करताना पकडले गेले आहेत, परंतु अलीकडेच कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
प्रेशर कुकरमध्ये ड्रग्स
सोमवारी माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी हेसरघाटाजवळील तारबनाहली गावात एका घरावर छापा टाकला, जिथे त्यांना एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याच्या घरात 50 लाख रुपये किमतीचे सामान सापडले. रिचर्ड एमबुडू सिरिल असे या व्यक्तीचे नाव आहे. 2019 मध्ये रिचर्ड आपल्या मोठ्या भावासोबत व्यवसायाच्या नावावर व्हिसा घेऊन दिल्लीत आला होता. सहा महिन्यांपूर्वी तो राममूर्ती नगरमध्ये आला आणि सुमारे दोन महिन्यांपूर्वी तारबनहली गावात राहू लागला. पोलिसांनी सांगितले की, हा व्यक्ती घरात प्रेशर कुकरद्वारे एमडीएमए क्रिस्टल्स म्हणजेच एक प्रकारचे ड्रग्स बनवत होता. रिचर्डकडून पोलिसांनी 930 ग्रॅम मिथाइलसल्फोनीलमेथेन, 580 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड क्रिस्टल्स, 5 लिटर ऍसिड आणि 10 लिटरचा प्रेशर कुकर जप्त केला आहे. यासोबतच पोलिसांना दोन वजन काटे, दोन मोबाईल फोन आणि एक स्कूटरही सापडली आहे. या संपूर्ण वस्तूची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
( हेही वाचा: भुजबळांच्या अडचणीत वाढ, अंजली दमानिया ठोठावणार उच्च न्यायालयाचे दार! )
मुख्य आरोपी फरार
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, रिचर्ड आणि त्याचा भाऊ इंटरनेटच्या माध्यमातून एमडीएमए क्रिस्टल बनवायला शिकले होते. त्याचा भाऊ या कृत्यातील मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. या दोघांनी इंटरनेटवर बघून प्रेशर कुकर विकत घेतला, त्यात हा कच्चा माल उकळून प्रेशर कुकरची वाफ गोळा करून ती थंड करून ड्रग्स बनवला जात होता.
तो प्रेशर कुकरमध्ये भात नाही, तर शिजवत होता ड्रग्ज#crimesnews #drug #smuggling pic.twitter.com/cBdNsMg3iw
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 13, 2022
गुन्हा दाखल
दिल्ली आणि मुंबईतून या वस्तू आणल्या होत्या. त्यांनी बंगळुरूसह भारताच्या अनेक भागात एमडीएमए क्रिस्टल्स विकले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत रिचर्ड आणि त्याच्या भावाविरुद्ध सोलादेवनहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. पोलीस सध्या रिचर्डच्या भावाचा शोध घेत आहेत.
Join Our WhatsApp Community