बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसला भीषण अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील मैनागुरी येथील डोमोहनी येथे चार ते पाच डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन पटनाहून गुवाहाटीला जात होती. या दुर्घटनेत सध्या तीन जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मेनागुरीजवळ सायंकाळी ५.०५ वाजता हा अपघात झाला. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
रेल्वेने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. 8134054999 या दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून माहिती मिळू शकते. याशिवाय ०३६२७३१६२२, ०३६२७३१६२३ या क्रमांकांवरही संपर्क साधता येईल. या परिसरात धुके पसरले असून रात्र झाल्यामुळे बचावकार्याला विलंब होणार आहे.
रेल्वेचे निवेदन
ट्रेन संध्याकाळी 5 वाजता रुळावरून घसरल्याचे रेल्वेने निवेदन जारी केले आहे. 12 डबे रुळावरून घसरले आहेत. गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस ट्रेनच्या 12 डबे रुळांवरून घसरले आहेत. डीआरएम (Divisional Railway Manager) आणि एडीआरएम (Additional Divisional Railway Manager) घटनास्थळी पोहोचले असून मेडिकल व्हॅनही रवाना करण्यात आल्या आहेत. असे रेल्वेने स्पष्ट केले आहेत.
Join Our WhatsApp Community#WATCH गुवाहाटी-बीकानेर एक्सप्रेस 15633 (यूपी) आज शाम करीब पांच बजे पटरी से उतर गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/43UMG0dfUQ
— ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2022