मुंबईत मागील चार दिवसांपासून नियंत्रणात असलेली कोविड रुग्णांची आकडेवारी खालच्या दिशेला सरकताना दिसत असतानाच, बुधवारी अचानक वाढली आणि गुरुवारी ही रुग्ण संख्या पुन्हा खाली घसरली. गुरुवारी दिवसभरात १३ हजार ७०२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात २० हजार ८४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
१२७ रुग्णांना ऑक्सिजन बेड
मुंबईत बुधवारी जिथे ६७ हजार ३३९ चाचण्या केल्यानंतर १६ हजार ४२० नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी ६३ हजार ०३१ चाचण्या केल्यानंतर १३ हजार ७०२ नवीन रुग्ण आढळून आले. तर यापैकी ११ हजार ५१० रुग्ण हे लक्षणे नसलेले असून दिवसभरात यापैकी ८७१ रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. यातील १२७ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली होती. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये एकूण ६ हजार ४१० रुणांना दाखल करण्यात आले होते, यातील ८७१ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ९५ हजार १२३ एवढी झाली आहे. तर दिवसभरात २० हजार ८४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला होता.
( हेही वाचा : तिकीट देता देता..कंडक्टरचा असाही मार्केटिंगचा फंडा… )
मृत्यू पावलेल्या सहापैकी पाच रुग्णांना दीर्घकालिन आजार होते. त्यात ५ रुग्ण पुरुष, तर १ रुग्ण महिला होती. हे सहाही रुग्ण साठीपार होते. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३६ दिवस एवढा आहे. तर झोपडपट्टया व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावर आली असून सक्रिय सीलबंद इमारतीची संख्या ६१ एवढी होती.
Join Our WhatsApp Community