गुरूवारीही राज्यातील कोरोना रुग्णाच्या नव्या नोंदीत ४६ हजार ४०६ रुग्ण आढळून आले. तर ३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच एका दिवसांत ३४ हजार ६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. वाढत्या रुग्णसंख्येसमोर दुस-यांदा जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.
३६ मृत्यू
गुरुवारी झालेल्या ३६ मृत्यूपैकी पुण्यात १९ कोरोना मृतांची नोंद झाली. मुंबईत ६ रुग्णांनी जीव गमावला. वसईमध्ये दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ठाणे, पालघर, पनवेल, नाशिक, अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा आणि नागपूरात प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
राज्यात अडीच लाखांच्याही पुढे कोरोनाचे सक्रीय रुग्ण
सध्या राज्यात अडीच लाखांच्याही पुढे कोरोनाचे सक्रीय रुग्ण विविध भागांत उपचार घेत आहेत. सक्रीय रुग्णांमध्ये मुंबईत ९५ हजार १२३ , ठाण्यात ६१ हजार ७९४ तर पुण्यात ३८ हजार १ रुग्ण आहेत. रुग्णसेवेचा मोठा प्रश्न या तीन शहरांमध्ये प्रामुख्याने उभा राहिला आहे. राज्यात ७० लाख ८१ हजार ६७ कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. त्यापैकी ६६ लाख ८३ हजार ७६९ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
Join Our WhatsApp Community