औषधासाठी उपयुक्त ठरणा-या व्हेल माशाच्या उल्टीची अवैधविक्री कोल्हापूर वनविभागाने तसेच कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने मिळून रोखली. वनअधिकारीच या विक्रीसाठी बनावट ग्राहक बनून गेले. या कारवाईला तब्बल सात तासांहून अधिक वेळ लागला. आरोपींना पकडण्यासाठी वनाधिकारी आरोपींच्या मागे आणि आरोपी बनावट ग्राहकांच्या मागे असा ससेमिरा या कारवाईत सुरु होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपींकडे व्हेल माशाची सुकलेली उल्टी असल्याची माहिती पोलिसांना आणि या कारवाईचा सुगावा लागू नये, यासाठी तब्बल सहावेळा विक्रीची ठिकाणे बदलली. अखेर शनिवार चौकातील ठिकाणी आरोपींना बनावट ग्राहक बनून आलेल्या वनाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत सांगलीतील सहा आरोपींना वनाधिका-यांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले. शिवाय विक्रीसाठी आरोपींनी वापरलेली चारचाकी तसेच दोन दुचाकीही वनविभागाच्या ताब्यात आहे. व्हेल माशाची तीन किलो चारशे ग्रॅमची स्थायू स्वरुपातील उल्टीही वनविभागाने ताब्यात घेतली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
(हेही वाचा –विनयभंग केलेल्या आरोपीला न्यायालयानं सुनावली अनोखी शिक्षा! वाचून व्हाल थक्क)
व्हेल माशाच्या उल्टीची विक्री करणारे आरोपी
विश्वनाथ रामदास, आल्ताफ मुल्ला, उदय जाधव, रफिक सनदी, किस्मद सनाक, अस्लम मुजावर हे सर्व आरोपी सांगलीतील रहिवासी आहेत.
का होते व्हेल माशाची उल्टीची विक्री
व्हेल माशाची उल्टी समुद्रात स्थायू स्वरुपात रुपांतरित होते. स्थायू स्वरुपातील उल्टीला आंबरग्रीस असे संबोधले जाते. या उल्टीचे औषधी उत्पादनासाठी मोठी मागणी आहे. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत व्हेल माशाची विक्री करता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत, पहिल्या वर्गवारीत पहिल्याच भागांत आंबरग्रीसला संरक्षण देण्यात आले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला दहा हजारांच्या दंडासह सात वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.
कारवाईचे पथक
कोल्हापूर वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक डॉ व्ही क्लेमेंट बॅन आणि उपवनसंरक्षक आर.आर.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभाग, वनक्षेत्रपाल करवीर, कोल्हापूराचे फिरते वनपथक, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे तसेच वनकर्माचा-यांनी मिळून केली.
Join Our WhatsApp Community