यंदा संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात पार पडणार आहे. 31 जानेवारीपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. CCPA ने 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान भाग टप्पा घ्यावा अशी शिफारस असल्याची माहिती मिळतेय.
पाच राज्यांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, यंदा दोन टप्प्यात होणाऱ्या अधिवेशनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर वाढत्या कोरोनाचे सावट असल्याने राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा –धक्कादायक! थेट उपमुख्यमंत्र्यांच्या नावाखाली खंडणीचा फोन)
CCPA recommends part one of Parliament's Budget Session from Jan 31 to Feb 11; part two from March 14 to April 8: Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2022
यावेळी ओम बिर्ला म्हणाले, संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या सर्व अधिकारी कर्मचारी व्यवस्थित असून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी संसदेतील 400 कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्लीत देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं चिंता आहे.
Join Our WhatsApp Community