‘या’ ५९ देशांमध्ये भारतीय नागरिकांना मिळणार विना व्हिसा प्रवेश

143

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२२ च्या अहवालानुसार, पासपोर्ट पॉवर रॅंकिंगमध्ये भारताने सुधारणा केली असून गेल्या वर्षीच्या ९० व्या स्थानाच्या तुलनेत यंदा भारत, पासपोर्ट पॉवर रॅंकिंगमध्ये ८३ व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्टधारक आता विना व्हिसा ओमानसह जगभरातील ५९ देशांना भेट देऊ शकतात. २००६ पासून भारताने या यादीत ३५ देशांचा समावेश केला आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा निर्देशांक इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या विशेष डेटावर आधारित आहे.

पाकिस्तानी पासपोर्ट धारकांना जगभरातील ३१ देशांमध्ये व्हिसा-मुक्त

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२२, यानुसार पासपोर्ट पॉवर रॅंकिंगमध्ये जपान आणि सिंगापूर हे देश प्रथम क्रमांकावर आहेत. तर जर्मनी आणि दक्षिण कोरिया हे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पाकिस्तानी पासपोर्टला सलग तिसऱ्या वर्षी, चौथ्या क्रमांकाचा सर्वात वाईट पासपोर्ट म्हणून या निर्देशांकात स्थान देण्यात आले आहे. अहवालानुसार, पाकिस्तानी पासपोर्ट धारकांना जगभरातील ३१ देशांमध्ये व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल प्रवेश आहे. अफगाणी पासपोर्ट निर्देशांकात तळाशी आहे.

( हेही वाचा : पर्यटन बंद, उपासमारीच्या भीतीने स्थानिक संतप्त )

भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-मुक्त देश

ओशियानिया

  • कुक बेटे
  • फिजी
  • मार्शल बेटे
  • मायक्रोनेशिया
  • नियू
  • पलाऊ बेटे
  • सामोआ
  • तुवालु
  • वानू

मध्य पूर्व

  • इराण
  • जॉर्डन
  • ओमान
  • कतार

युरोप

  • अल्बेनिया
  • सर्बिया

कॅरिबियन

  • बार्बाडोस
  • ब्रिटिश व्हर्जिन बेटे
  • डोमिनिका
  • ग्रेनेडा
  • हैती
  • जमैका
  • मोन्सेरात
  • सेंट. किट्स आणि नेव्हिस
  • सेंट. लुसिया
  • सेंट. व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
  • त्रिनिदाद आणि टोबॅगो

आशिया

  • भूतान
  • कंबोडिया
  • इंडोनेशिया
  • लाओस
  • मकाओ (SAR चीन)
  • मालदीव
  • म्यानमार
  • नेपाळ
  • श्रीलंका
  • थायलंड
  • तिमोर-लेस्टे

अमेरिका

  • बोलिव्हिया
  • एल साल्वाडोर

आफ्रिका

  • बोत्सवाना
  • केप वर्दे बेटे
  • कोमोर्स बेटे
  • इथिओपिया
  • गॅबॉन
  • गिनी-बिसाऊ
  • मादागास्कर
  • मॉरिटानिया
  • मॉरिशस
  • मोझांबिक
  • रवांडा
  • सेनेगल
  • सेशेल्स
  • सिएरा लिओन
  • सोमालिया
  • टांझानिया
  • ट्युनिशिया
  • युगांडा
  • झिंबाब्वे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.