पुण्यातही कोरोनाचा कहर! पालिका सज्ज

114

मुंबईच्या तुलनेत पुण्यात दिवसाला कोरोना रुग्णांचा आकडा वाढत जात आहे. गुरुवारी पुण्यात ९ हजार ६४५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण ३, पुणे महापालिका क्षेत्रात २, तर कॅन्टोन्मेंटमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात २ लाख १२ हजार ७३५ मुलांना पहिला डोस

दरम्यान, गेल्या १० दिवसांत पुणे जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील सुमारे ३९ टक्के किशोरवयीन मुलांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. पुण्यात १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. १२ जानेवारीपर्यंत एकूण २ लाख १२ हजार ७३५ मुलांना पुणे जिल्ह्यात कोविड-19 लसीचा पहिला डोस मिळाला, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा हरवलेल्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचा ‘स्पेशल ड्राईव्ह’!)

पालिका सज्ज

पुणे महानगरपालिकेने जंबो हॉस्पिटलच्या ८०० खाटांपैकी १०० बेड आपातकालीन उपचारांसाठी तयार ठेवले आहेत. तसेच रुग्णालयातील तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या, कोरोना रूग्णांवर बाणेर आणि नायडू रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बाणेर येथे आणखी एक नवीन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी विशेष कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने तर, सर्व खाजगी कार्यलये 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.