राज्य आणि केंद्र सरकारचे लसीकरणावरुन मतभेद आहेत. एका बाजूला राज्याचे आरोग्य मंत्री म्हणतात की केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण कमी होत आहे. परंतु वास्तवात आरोग्य कर्मचा-यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे यावेळी आरोग्य कर्मचा-यांना बूस्टर डोस देणे अशक्य आहे, म्हणून ख-या अर्थाने फ्रंटलाईन वर्कर बूस्टर डोसपासून वंचित आहेत, असं चित्र समोर आलं आहे.
तीन महिने बूस्टर डोस नाही
राज्यातील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह आल्याने, पुढचे किमान 3 महिने ते बूस्टर डोस घेऊ शकणार नाहीत. यातून लसीकरणाच्या या टप्प्यात अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, 4 दिवसांत 2 लाख 49 हजार 793 कर्मचा-यांना डोस देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 49 हजार 793 जणांना बूस्टर डोस देण्यात आला असून, या तिस-या डोससाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे, आरोग्य अधिकारी सांगतात.
(हेही वाचा: राज्यात लसीकरण बंधनकारक होणार? )
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम
राज्यात 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून, यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन आणि अति जोखमीचे रुग्ण गणले गेले आहेत, मात्र त्यांच्या दुस-या डोसचा कालावधी संपलेला असावा अशी अट आहे. तसेच जर कोणी पाॅझिटिव्ह आढळून आले, तर पुढचे किमान 3 महिने डोस घेता येणार नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढलेला दिसून येत नसल्याचे, राज्य लसीकरण अधिकारी डाॅक्टर सचिन देसाई यांनी सांगितले आहे. बूस्टर डोस हा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम असून, पहिल्या दोन दिवसांतच राज्यात 56 हजार 464 आरोग्य कर्मचारी, तर 28 हजार 119 फ्रंटलाईन कर्मचा-यांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community