सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील अडीच महिने आजारी आहेत. घराबाहेर पडले नाहीत. अधिवेशन असो, मंत्रिमंडळ बैठक असो अथवा पंतप्रधानांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक असो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाही. त्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेला अक्षरशः सळो कि पळो करून सोडले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पदभार दुसऱ्यावर सोपवावा असा धोशा लावला आहे, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे विधान केले आहे, त्यावर खळबळ माजली आहे.
अजित पवार म्हणाले…
पुण्यात कोरोना संसर्गाचा आढावा बैठक घेतल्यावर अजित पवार माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘जर राज्यातील ऑक्सिजनचा वापर ७०० मेट्रिक टन पेक्षा अधिक वाढला तर लॉकडाऊनचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य साहेब ठाकरे घेतील’, असे विधान केले. यामुळे अजित पवार यांनी चुकून का होईन मुख्यमंत्री पदाची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे जाणार आहेत का, असे अप्रत्यक्षपणे सांगितले का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजप म्हणते, उद्धव ठाकरेंनी पदभार सोडावा…
भाजप मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची तब्येत ठीक नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री पदाचा पदभार हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवावा किंवा पत्नी रश्मी ठाकरे यांना द्यावी अथवा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवावी, अशी मागणी करत आहे. मात्र याविषयी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पक्ष काहीही बोलू शकत नाही. अशा परिस्थिती अजित पवार यांनी केलेले हे विधान सर्वांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.
Join Our WhatsApp Community