पुण्यात एका एमपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून तो नैराशात होता.
म्हणून उचललं टोकाचं पाऊल
यापूर्वी देखील एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमर हा पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात राहत होता. पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडल्यानंतर अमर मोहिते हा नैराशात गेला होता. त्यातच कोरोनाच्या काळात एमपीएससीची परीक्षाही अनेकदा रद्द करण्यात आली. तसेच, ती परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यातूनच नैराशात असलेल्या अमर मोहिते याने शनिवारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे आढळून येत आहे.
(हेही वाचा – ठाण्याच्या मानपाड्याच्या बिबट्यावर वनविभागाची नजर)
सहा महिन्यातील दुसरी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने अभ्यासासाठी अमर पुण्यात आला होता. सदाशिव पेठेतील विठ्ठल मंदिराजवळच्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता. तिथेच त्याने विष प्राषण करुन आत्महत्या केली. गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आहे. स्पर्धा परीक्षा सातत्यानं पुढं ढकलल्या जात असल्यानं मागील वर्षी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं पुण्यात आत्महत्या केली होती
Join Our WhatsApp Community