वीर सावरकर ‘अंदमान मुक्ती शताब्दी वर्ष’ निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर!

189

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रकुट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमान मुक्ती शताब्दी वर्षानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यभरातून सावरकरप्रेमींनी सहभाग नोंदवला होता. राज्यभरातून विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक आणि कर्मचार्‍यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. वीर सावरकर बंधूंच्या अंदमानातील सुटकेला २ मे, २०२१ रोजी १०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त संपूर्ण देशभर हे वर्ष ‘अंदमान मुक्ती शताब्दी वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे.

अंदमानमध्ये बंदीवासात वीर सावरकरांनी काय केले ? अंदमानातील वीर सावरकर कसे होते ? त्यांचे अंदमानातील कार्य समाजासमोर यावे, या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रकुट यांच्या संयुक्त विद्यमाने सदर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांचे निबंध राष्ट्रकुटच्या पुढील अंकांमधून टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केले जाणार आहेत.

अंतिम विजेते

गट १
प्रथम क्रमांक – समिक्षा भंदे
द्वितीय – प्रणय गोळवलकर
तृतीय – स्नेहल कांबळे

गट २ खुला गट

प्रथम क्रमांक – उमेश शेट्टी
द्वितीय – बकुल बोरकर आणि वैशाली सुळे
तृतीय – गार्गी देशपांडे

( हेही वाचा : शिवकालीन ऐतिहासिक वास्तू धोक्यात! )

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रकुट यांच्याकडून सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. कोव्हिड निर्बंध शिथिल झाल्यानंतर सदर स्पर्धेचा बक्षिस समारंभ आयोजित केला जाणार आहे. भविष्यातही राष्ट्रकुट तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत व स्पर्धांमध्ये असाच सहभाग घेण्यासाठी संपादक प्रकाश ओहळे यांनी आवाहन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.