१९९३ च्या स्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा पाकिस्तानात मृत्यू

137

१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा हृदय विकाराच्या झटक्याने पाकिस्तानच्या कराचीमध्ये मृत्यू झाला आहे. गाझी हा छोटा शकीलचा जवळचा मित्र होता व ९३ च्या स्फोटानंतर दाऊदच्या आश्रयाला गेला होता. गाझी हा शेवटपर्यंत दाऊद आणि छोटा शकीलच्या जवळ होता. गाजी हा १९९३ च्या स्फोटातील फरार आरोपी होता.

(हेही वाचा – कुर्ला कसाईवाड्यात ‘गोमांस’ तस्करांचा पोलिसांवर हल्ला! )

अन् गाझी दाऊद सोबतच परदेशात पळाला

मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम गाझीचा शनिवारी काराचीतील एका रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, मागील काही महिन्यांपासून तो आजारी होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सलीम गाझी आरोपी होता. गाझी याची या स्फोटात महत्वाची भूमिका होती. त्यानंतर गाझी हा दाऊद सोबतच परदेशात पळून गेला होता. १९९३ च्या मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात २५७ लोक मारले गेले आणि ७१३ जण जखमी झाले. हे बॉम्ब स्फोट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने बाबरीच्या वादातून मुंबईत घडवून आणले होते.

मुंबई पोलिसांच्या फरार आरोपीच्या यादीत गाझीचं नाव

मुंबईत स्फोटके आणण्यापासून विविध ठिकाणी बॉम्ब पेरण्यात दाऊद आणि त्याचे सहकारी यांच्यासह सलीम गाझी याची महत्वाची भूमिका होती. मुंबई पोलिसांच्या फरार आरोपीच्या यादीत गाझी याचे नाव होते. मात्र मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटानंतर गाझी हा भारतातून पळून परदेशात दाऊदच्या आश्रयाला गेला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.