शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या, अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते आणि प्राध्यापक अशी ओळख असणारे एन. डी. पाटील यांचं सोमवारी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे.
कोरोनावरही केली होती मात
वातावरणात झालेल्या बदलाने त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती, मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती, मात्र यावेळी ते अपयशी ठरले.
( हेही वाचा: बालविवाह अजूनही सुरूच! इतके बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश )
पाटील यांच्याविषयी
15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल. एल. बीचे शिक्षण पूर्ण केले होते.
Join Our WhatsApp Community