कोरोना लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती! केंद्राकडून ‘या’ विशेष टपाल तिकीटाचे अनावरण!

140

देशातील कोविड-19 लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी स्वदेशी बनावटीच्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीवर आधारित टपाल तिकीटाचे अनावरण केले. या तिकीटावर एक आरोग्य कर्मचारी एका महिलेला लस देताना दाखवण्यात आले आहे. एका विशेष टपाल तिकिटावर आरोग्य कर्मचारी वृद्ध लाभार्थीला लसीचा डोस देत असल्याचे चित्र आहे. यासोबतच तिकीटावर कोव्हॅक्सीनची कुपीही दाखवण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील 70 टक्के प्रौढ लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत तर 93 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जवळपास 92 टक्के प्रौढ लोकसंख्येला किमान लसीचा एक डोस मिळाला आहे, तर 68 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी हे विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करतांना लिहिले की, ‘हे तिकीट देशभरातील फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिक समुदायाने लोकांना कोरोना महामारीपासून वाचवण्यासाठी केलेले उल्लेखनीय कार्य प्रतिबिंबित करते. एका वर्षात आम्ही १५६ कोटी डोस दिले आहेत. देशातील लसीकरण मोहीम ही जागतिक स्तरावरील एक आदर्श आहे.’

(हेही वाचा –यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दिसणार नाही, वाचा कारण)

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ३ जानेवारी २०२०ला सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंजूरी दिली. त्यानंतर १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी २७७ दिवसात भारताने लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.