पंजाब विधानसभेची निवडणूक लांबणीवर! 14 फेब्रुवारीऐवजी ‘या’ दिवशी होणार मतदान

110

पंजाबमधील निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी ही मतदानाची तारीख निश्चित केली होती. यानंतर संत रविदास जयंती पाहता विविध राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती, ती केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. नियोजित तारखेनुसार 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, आम आदमी पक्ष, भाजप, अकाली दल आमि कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या लोकांनी सांगितले की, 16 फेब्रुवारीला संत रविदासांची जयंती आहे. या निमित्ताने लाखो लोक बनारसला जातात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार. अनेक मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी या पक्षांनी केली होती. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निडवणूक आयोगाने घेतला आहे.

dolon

माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) नेही निवडणुका आठवडाभर पुढे ढकलण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, या मागणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये मतदानाची तारीख वाढवण्याच्या मुद्द्यावर आज बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.