मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण काय पडेल याची कल्पना नसली तरी आपल्या घरातच पुन्हा नगरसेवकपद राहावे यासाठी आता आपल्यासह वारसदाराची ओळख विद्यमान नगरसेवकांच्या माध्यमातून घडवून दिली जात आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांनी सोशल मिडियावर कोणत्या कामांच्या माहितीच्या पोस्टमध्ये बायको, मुलगा यांचे छायाचित्र झळकवूनच इच्छुकांच्या यादीमध्ये त्यांना उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२७ ऐवजी २३६ प्रभागांचा आराखडा महापालिका निवडणूक विभागाने राज्य निवडणूक विभागाला सादर केला आहे. त्यातच राज्य सरकारच्या ९ प्रभाग वाढीबाबत घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही उच्च न्यायालयात रद्दबातल करून करून टाकली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आता मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांबाबतच्या हरकती व सूचना तसेच त्या प्रभागांवरील आरक्षण आणि त्यावरील हरकती व सूचनांचा कार्यक्रम कधी जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे त्यानंतर किंवा त्यासोबतच निवडणूक कार्यक्रम जाहीर करते याकडेही लक्ष आहे.
( हेही वाचा : अरे व्वा…जे.जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिले १६० किलो वजनाच्या तरूणीला जीवनदान! )
सोशल मिडिया पोस्टरद्वारे ओळख
मात्र, निवडणूक आयोग केव्हाही निवडणूक मतदानाचा कार्यक्रम जाहीर करेल, हे गृहीत धरुन आता विद्यमान नगरसेवकांनी प्रभागाचे आरक्षण बदल्यास त्याठिकाणी आपली पत्नी, मुलगा यांची ओळख आता जाहीरात फलक तसेच सोशल मिडियावरील पोस्टद्वारे करून दिली जात आहे. आरक्षण जर बदल्यास आपल्या प्रभागात पर्याय असून त्याठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशाप्रकारचा प्रयत्न आहे. त्यातून आता प्रत्येक नगरसेवक व नगरसेविका यांच्या पोस्टमध्ये मुलगा, पत्नी यांचे फोटो प्रामुख्याने झळकताना दिसत आहे.
वारसदाराची ओळख
प्रत्यक्षात आरक्षण बदलल्यास तिकीट वाटपात आपली उमेदवारी कापली जाईल या भीतीने आधीच आपल्या पोस्टद्वारे आपल्या पुढील वारसदाराची ओळख विभागातील जनतेला आणि पर्यायाने पक्षालाही याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे विभागातील प्रत्येक विकासकामांच्या जाहीरात फलकांवर संयुक्त छायाचित्रे झळकताना दिसून भविष्यात उमेदवारी पार पडल्यास पुढे त्या चेहऱ्याची अधिक ओळख करून देण्याची गरज नाही. विभागातील जनतेला हा चेहरा ज्ञात झाल्याने मतदानावर तेवढासा परिणाम होत नाही,असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community