मुंबईची रुग्ण संख्या नियंत्रणात! जाणून घ्या किती?

216

मुंबईत वाढलेला कोविड रुग्णांचा आकडा आता जवळपास नियंत्रणात येताना दिसत असून सोमवारी चक्क पाच हजारांएवढेच रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी जिथे दिवसभरात ७ हजार ८९५ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी दिवसभरात ५ हजार ९५६ रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांच्या तिप्पट म्हणजे १५ हजार ५५१ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले. तर सलग तिसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा दोन अंकीमध्ये आहे. दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या तिप्पट

मुंबईत रविवारी जिथे ५७ हजार ५३४ चाचण्या केल्यानंतर ०७ हजार ८९५ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी ४७ हजार ५७४ चाचण्या केल्यानंतर ५ हजार ९५३ नवीन रुग्ण आढळून आले. तर यापैकी ४ हजार ९४४ रुग्ण हे लक्षणे नसलेले होते. अर्थात ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. दिवसभरात यापैकी ४७९ रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ४५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली होती. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये एकूण ५ हजार ६२८ रुग्णांना दाखल करण्यात आले होते, एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ७५७ एवढी झाली आहे. तर दिवसभरात १५ हजार ५५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

( हेही वाचा : विद्यमान नगरसेवक सोशल मिडियावर का करून देत आहेत वारसदारांची ओळख? )

तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला होता. सलग तिसऱ्या दिवशीही मृत्यूने दोन अंकी आकडा गाठला आहे. मृत्यू पावलेल्या १२ मृत्यू पैंकी ०९ रुग्णांना दिर्घकालिन आजारी होतेत्यात ९ रुग्ण पुरुष तर ३ रुग्ण महिला होती. यातील अकरा रुग्णांचे वय साठ वर्षांपेक्षा अधिक होते. तर उर्वरीत एकाच वय चाळीस वर्षांखालील होते. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५५दिवस एवढा आहे. तर झोपडपट्टया व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावर आली असून सक्रिय सीलबंद इमारतीची संख्या केवळ ४७ एवढी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.