कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज संख्येत घट होत असताना राज्यात रुग्णसंख्येत ठाणेकरांनी पहिला क्रमांक लावला आहे. रविवारपासून ठाण्याचा सक्रीय रुग्णसंख्येत पहिला तर मुंबईचा दुसरा क्रमांक लागला आहे. सोमवारी ठाण्यात ६३ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरु असल्यची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली तर मुंबईत ५० हजार ७५७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु होते. सोमवारी बारा दिवसानंतर राज्यांतील एकूण रुग्ण संख्येतही कमालीची घट नोंदवली गेली. राज्यातील एकूण नव्या रुग्णसंख्येचा आकडा ३१ हजार १११वर नोंदवला गेला.
९ जानेवारीपासून राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा हा चाळीसहजारांच्यापुढे नोंदवला जात आहे. तर राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांच्या पन्नास टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत सापडत होते. मात्र गेल्या चार-पाच दिवसांत राज्यात दरदिवसाला डिस्चार्ज मिळणा-या रुग्णांत कमालीची वाढ दिसून आली. त्यात मुंबईतील वाढत्या रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली. त्यातुलनेत ठाण्यातील रुग्णसंख्या कमी होण्याचे आव्हान अद्यापही सरलेले नाही.
( हेही वाचा : ऐन कोरोनाकाळात वैद्यकीय रुग्णालयातील प्राध्यापकांचा एल्गार )
रविवारची मुंबई, ठाण्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या
- ठाणे – ६३ हजार १०९
- मुंबई – ५० हजार ७५७
सोमवरची मुंबई, ठाण्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या –
- ठाणे – ६४ हजार २५९
- मुंबई – ६० हजार ३७१
सोमवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या – २९ हजार ९२
राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या – २ लाख ६७ हजार ३३४
राज्यातील आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या – ७२ लाख ४२ हजार ९२१
राज्यातील आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ६८ लाख २९ हजार ९९२
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९४.३ टक्के